नातं म्हणजे चांदण..जसा रात्री पडणा-या चांदण्यात एकटा चंद्र दिसतो ना तस काही आपण असतो इतके जवळ असुनही भरवसाचं कुठलच चांदण नसतं त्याच्यासाठी...आणि हे चांदण म्हणजे तु करत असलेल्या प्रवासात तुला क्षणभराची..काही काळापुरती सोबत..मग ते कुठलही असो आइ-बाप, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, प्रेयसी-बायको, मुलं-बाळं, आणि बरेच काही ..एका ठराविक वेळेपुरते ही आपल्याला या प्रवासात कंपनी देतात, आपल्या सोबत हसतात, रडतात, जगतात, त्यांनाही आपला प्रवास असतो रे..आपण फ़क्त ती सोबत एंजॉय करायची...सुख: दुख: वाटुन घ्यायचे..जशी तुलाही त्यांची गरज असते तशी त्यांनाही तुझ्या सोबतीची गरज असते.. त्यात गुंतण, न गुंतण हे सर्वस्वी तुझ्या हातात असतं, तुझ्या म्हणण्यापेक्षा तुझ्या मनाच्या हातात...!!
सचिन,
(सचिनजी म्हणण्याइतके तुम्ही पोक्त नसावेत असे तुमच्या लेखनाच्या कोवळेपणातून वाटते. चुकले असल्यास क्षमस्व.)
कट्ट्यावरची, तरुणाईची भाषा आणि तत्त्वज्ञान हे सगळे छान मिसळून गेलेले आहे. शुद्धलेखनाकडे लक्ष थोडे जास्त दिलेत तर अतिशय सुंदर वाटेल.
शुभेच्छा
(आस्वादक)
वृंदा