प्रदीप मुरकुटे,
नमस्कार
- याच संकेतस्थळावर यापू्र्वी सादर झालेल्या सचिन काकडे यांच्या 'मुक्त'छंद कविता आपण वाचलेल्या आहेत काय...?
- त्या 'मुक्त'छंद कवितांच्या तुलनेत त्यांनी लिहिलेली ही ताजी कविता छंदोबद्धच आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
- आता एखाद्या कसलेल्या छंदकवीने लिहावी; तशी ही रचना छंदोबद्ध नाही, हे मलाही प्रतिसाद देताना माहीत होतेच. माझ्या प्रतिसादामधील एक वाक्य असे आहे - तुझी ही छंदोबद्ध लिहिण्याच्या प्रयत्नातील दुसरी कविताही छान. त्यातील प्रयत्न हा शब्द आपण ध्यानी घ्यावा.
- एखादा कवी मुक्तछंद सोडून छंदोबद्ध लिहिण्याच्या दिशेने काही प्रयत्न करीत असेल, तर त्याला प्रोत्साहन देणे हे माझे - छंदात लिहिणारा एक कवी या नात्याने - काम नव्हे; तर कर्तव्यच होय आणि त्याच नात्याने मी सचिन काकडे यांच्या या 'छंदो'बद्ध कवितेला प्रतिसाद दिलेला आहे.
- उसन्याच माझ्या या जगण्याला
फ़ुटक्या क्षणांचा गं काय हवाला?
या ओळी छंदात बऱ्यापैकी जमलेल्या आहेत, असे उदाहरणादाखल सांगता येईल. - येथे बऱ्यापैकी हा शब्द आणि आधीच्या प्रतिसादातील प्रयत्नातील हा शब्द, असे दोन्ही शब्द नीट ध्यानी घ्यावेत, ही विनंती. विचारणेबद्दल अत्यंत आभारी आहे.
कळावे,
आपला,
प्रदीप कुलकर्णी