<span style="font-style: italic;">

सावरकर.ऑर्ग हे संकेतस्थळ नुकतेच सुरू झाले आहे. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार:

&nbsp;संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे विमोचन दि. २६ फ़ेब्रुवारी २००८ या सावरकरांच्या आत्मार्पण-दिवशी झाले. सशस्त्र क्रांती, समाजसुधारणा, बुद्धिवाद व हिन्दुत्व हे सावरकरांच्या जीवनाचे महत्वाचे बिंदू होते. संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्यात या चार विषयांना प्राधान्य दिलेले असून या विषयांवरील सावरकरांचे मूळ साहित्य देण्यात आले आहे. शिवाय सावरकरांचा संक्षिप्त जीवनपटही देण्यात आला आहे. सावरकरांची शेकडो दुर्मिळ छायाचित्रे, त्यांच्या आवाजातील भाषणे, चलचित्रफ़िती या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये आहेत. सन १९२४ मध्ये लिहिलेले सावरकरांचे पहिले मराठी चरित्र या संकेतस्थळात दिले आहे. हे संकेतस्थळ सावरकरांचे थोरले बंधू कै. बाबाराव व वहिनी कै. सौ. येसूवहिनी यांना समर्पित आहे.

हे संकेतस्थळ हौशी तत्त्वावर सिद्ध करण्यात आले आहे. सावरकरप्रेमाचा समान धागा असलेल्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संकेतस्थळ साकार झाले आहे. हे संकेतस्थळ वेळोवेळी समृद्ध करण्याचा प्रयत्न चालू राहील.



मनोगताप्रमाणेच हे संकेतस्थळदेखील एक ड्रुपल संकेतस्थळ आहे, असे दिसते.