,
००६. तस्य भूमिषु विनियोगः ।

त्या प्रज्ञेच्या उदयाचा विनियोग पुढील भूमीच्या ठिकाणी करावा.

येथे भूमी  म्हणजे चित्तभूमी असा अर्थ घ्यायला हवा. चित्त स्थूलातून सूक्ष्मात संयमित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे चित्ताची योग्यता वाढवित नेऊन समाधिसाठी पात्र ठरता येते.

००७. त्रयम् अन्तरङ्गं पूर्वेभ्यः ।

यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्या पाच पूर्वीच्या योगांगांच्या अपेक्षेने धारणा, ध्यान आणि समाधी ही तिन्ही सबीज संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने होत. 

सबीज म्हणजे सालंबन. धारणा, ध्यान यासाठी आलंबन लागते. सद्गूरूंकडून मिळालेले सबीज नाम येथे समजून घेणे गरजेचे वाटते.
 
००८. तद् अपि बहिरङ्गं निर्बीजस्य ।

मात्र निर्बीज असंप्रज्ञात समाधीसाठी तीही बहिरंग साधनेच होत.

निर्बीज समाधीत वरील गोष्टींचे प्रयोजन उरत नाही. कारण या अवस्थेत काही शिल्लक राहत नाही. "उरला उरे विठ्ठल " ही तुकाराम महाराजांची अनुभूती त्यांनीच शब्दबद्ध केली आहे.

नरेंद्र, आज अगदी वाटले म्हणून लिहित आहे. अगदीच त्रोटक होते आहे लिखाण असे प्रामाणिकपणे वाटते. काही ठिकाणी शब्दांचे योग्य अर्थ दिलेत तर समजणे सोपे जाईल असे वाटते.