कुठेतरी वाचलेल्या ह्या चार ओळी आठवल्या -

स्वातंत्र्याचा ध्यास दे कुणा कठोर कारावास
कुणास विरहोच्छवास, कुणी हो जननिंदेचा घास
अंदमानचा वास, कुणाच्या गळ्यात येई फास
शाईने का लिहिला जाई राष्ट्राचा इतिहास?

सावरकर गेले तेव्हा मी दुसरीत होतो. तेव्हा सावरकर म्हणजे कोण हे फक्त ते बोटीतून उडी मारून इंग्रजांच्या तावडीतून निसटले एवढ्याच गोष्टीपुरते माहीत होते. मात्र त्या दिवशी बाईंनी दुसरीतल्या मुलांना समजेल इतपत सोप्या भाषेत सावरकरांची माहिती आम्हाला सांगितली, त्याची आठवण झाली.