स्वर-काफिये गझलेत चालतात का
जाणकार भाष्य करतीलच पण (अर्थात मी काही जाणकार नाही ) स्वर-काफिये का चालू नयेत.. एखाद्या रचनेला गझल म्हणताना योग्य तो भाव, योग्य त्या वृत्तात बसवला जावा आणि रदिफ, काफिया, अलामत सांभाळली जावी इतकी अपेक्षा रास्त वाटते. स्वर काफिया चालत नाही वगैरे उगाच नंतर जबरदस्ती "वाढवलेले" नियम वाटतात. जाणकार भाष्याच्या प्रतीक्षेत
बाकी माणुस१, गझल आवडली!
-ऋषिकेश