देवनागरीतल्या डोक्यावरल्या रेघेचा मुद्दा अत्यंत चांगला आहे. या रेघा काढून टाकल्या तर पुष्लळच वेळ (आणि शाईही) वाचेल. पण याच सोबत माझी आणखी एक सूचना आहे. इ/ई , उ/ऊ  आणि ए /ऐ ही स्वरचिन्हेही आपण हद्दपार करून त्या जागी फक्त 'अ' व त्याला जोडलेले इ/ई,उ/ऊ अन ए/ऐ च्या स्वरचिन्हांची योजना केली तर? मराठीची वर्णमाला आधीच लांबलचक आहे. ती मधले हे सहा स्वर कमी झाले तर पुढच्या पिढीचा दुवा मिळेल. 'इतर' मधला 'इ' असा लिहिण्याऐवजी 'इ' चे जे स्वरचिन्ह आहे ते 'अ' ला जोडायचे. अशाच प्रकारे इतरांनाही. अशा प्रकारे मुलांना 'अ' आणि इ/ई, उ/ऊ व ए/ऐ ची स्वरचिन्हेच फक्त शिकावी लागतील. आता येथे तसे लिहून दाखविण्याची सोय नाही, पण 'प्रोग्रामिंग'मध्ये तशा दुरुस्त्या सहज करता येतील.