प्रिय गांगल सप्रेम नमस्कार,

या ठिकाणी दोन गोष्टींची गल्लत होत असावी असे मला वाटते आहे.

आपल्या संशोधनाविषयी अधिक जाणून घेण्याविषयी बऱ्याच जणांनी यापूर्वीच एका चर्चेच्या ओघात म्हटले आहे. तरी त्याविषयी चर्चा नक्कीच आवडेल.

पण सध्याची चर्चा ही आपल्या लोकसत्तातील लेखाविषयी, विशेषतः त्यातील भाषाविषयक बाबींविषयी असावी असा सर्वांचा रोख असावा असे वाटते.

मला वाटते की आपण करू इच्छित असलेल्या चर्चेचा वेगळा दुवा व्हावा; पण या चर्चेत केवळ या लेखाविषयीची चर्चा व्हावी.

आता आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाविशयी
प्रश्नामधील न समजलेला भाग म्हणजे "भाषेतील अक्षर" ही शब्दयोजना !

टुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारचा प्रश्न हा प्रश्नकर्त्याच्या मनातील "नाही" हे उत्तर अधोरेखित करण्यासाठी असते असे मला वाटते. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणाने (अथवा आमच्या सारख्या सर्वसामान्यांना समजेल असे) मांडल्यास चर्चा पुढे जाऊ शकेल.

- पराग