पेव फुटणे ची व्युत्पत्ती मलाही आत्ताच कळली. धन्यवाद.

कोणे एके काळी बहुधा विविध प्रकारच्या वनस्पती घरांच्या जवळपास असाव्यात. त्यामुळेच बोलीभाषेत त्यावर आधारित वाक्प्रचार आले असणार. मागे एकदा कोकणात गेलो असताना मुंबईत कधीही न दिसणाऱ्या असंख्य वनस्पती व पक्षी दिसले. बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अजूनही भरपूर प्रमाणात जैवविवधता टिकून आहे. या उद्यानाला मुंबईची फुप्फुसे म्हणतात ते उगाच नाही.

आज आपल्या शहरांमधून काही ठराविक झाडे व (झुडुपे) सोडल्यास जराही हिरवळ उरलेली नाही. शहरांतील इमारतींमुळे एकाच शब्दाची भर पडली आहे. तो म्हणजे काँक्रिटचे जंगल.

पेव या वनस्पतीचे छायाचित्र असल्यास कृपया ते मनोगत वर टाकावे.