विलासराव नमस्कार,

जाणकारांना प्रतिसादास उद्युक्त करणे, अजाणत्यांची जिज्ञासा जागवणे, किमान आपल्या संस्कृतीने परंपरागत मौखिक पठणाद्वारे संचित केलेल्या आपल्या सांस्कृतिक ज्ञानाची ओळख करून घेण्यास सर्वसामान्यांना प्रोत्साहित करणे ह्या उद्देशाने मी ही मालिका लिहीत आहे.

अपुरी, त्रोटक वाटणे स्वाभाविकच आहे. शिवाय मी 'तज्ञ' म्हणून नव्हे तर 'विद्यार्थी' म्हणूनच हे लिहीत आहे.

आपल्यासारख्या जाणकारांनी दखल घेतली हे माझे भाग्यच होय. त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

आपल्या वरील माहितीचीही मी नोंद घेतली आहे. त्यावर भाष्य करावे एवढा माझा अधिकार नाही.

आपण आवश्यक समजाल तेव्हा तेव्हा अशाचप्रकारे अवश्य प्रतिसाद द्यावा. मी आभारी राहेन.

आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा उपयोग करू शकलो पाहिजे,
तसेच कमीत कमी पुढल्या पिढ्यांकडे यथाशक्य सुपूर्त करू शकलो पाहिजे असे मला वाटते.