असा उपक्रम मुंबईला कोणी सुरू केल्यास मी स्वतः त्यात भाग घ्यायला तयार आहे. शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके नुसतीच पडून असतात. आपल्या घरीही सापडतील.. जागर करायला हवा असे ज्याना वाटते त्याना जागर करायचे मार्गही सहज सापडतील.
साधनाताई,
तुमचे हे विचार अगदी अनुकरण करण्यासारखे आहेत. पण 'ज्याला वाटते --- त्याला सापडेल' हे तत्त्व फारसे उपयोगी नाही. कित्येकजण असे असतील त्यांना जागर करायला हवा असे वाटते; पण मार्ग माहित नसतो. कुणाला भेटायचे, कुणाच्या ओळखी काढायच्या इ. नेहमी पडणारे प्रश्न असतात.
तुमच्यासारके जे काम करायला तर्यार आहेत आणि त्यान्ना मार्गही माहित आहेत, त्यांनी आपल्या उदहरनाने ते इतरांना समजावून सांगावेत. मनोगतासारख्या व्यासपीठाचा असा स्दुपयोग करावा, ही विनंती
आपला
सुधाकर भस्मे