खालील विनोदाची कुठल्याशा सर्वेक्षणात सहस्त्रकातला सर्वात विनोदी किस्सा म्हणून निवड झाली होती.

दोन मित्र जंगलात शिकारी साठी जंगलात गेले होते. तेव्हा तेथे एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. पहिला मित्र चपळाईने झाडीत पळाला पण दुसरा मात्र त्या अस्वलाच्या तावडीत सापडला.

थोड्या वेळाने झाडीत लपलेला मित्र बाहेर येउन पाहतो तर दुसरा जमिनीवर निपचित पडलेला.

झालं, घाबरून त्याला धाम सुटला. आता काय करावे अश्या विचारात असतानाच त्याला मदतीसाठीचा नंबर आठवला. 

त्या मदत कक्षात उत्तर द्यायला एक तरुणी बसलेली. त्यांचा संवाद सुरु झाला.

तो -मित्रावर माझ्या  एका अस्वलाने हल्ला केला आहे! मी काय करू.. मेला तर नसेल ना??

ती - असे आधिच घाबरून जाऊ नका. आधी तो मेला आहे याची खात्री करून घ्या..

(ठो‌ऽऽ....  पलीकडून गोळी चालवल्याचा आवाज येतो)

तो - आता??