नरेंद्र,
आपल्या ह्या लिखाणाबद्दलचे माझे विचार मी आपल्याशी व्यक्त केले होतेच.
कर्म धर्म संयोगाने सद्गुरू आणि काही वेदांती अभ्यासक / प्रवचनकार यांच्यामुळे या विषयाची गोडी लागली आणि साधनेच्या माध्यमातून अनुभवाची जोड मिळत गेली हे माझे भाग्य.
आपल्यासारख्या जाणकारांनी दखल घेतली हे माझे भाग्यच होय.
हा आपला माझ्याबद्दल चा ग्रह कृपया दूर करावा. मीही एक साधक म्हणूनच या विषयाकडे पाहतो. कदाचित माझे अज्ञान आपल्यापेक्षा कमी असेल किंवा ते माझ्या लक्षात आले नसेल हेही खरे. आपण विनयशील आहात हे मला माहित आहे. तो विनय असा शब्दांतून प्रगटला असणार.
बाकी आपल्या उपक्रमाबद्दल ओढ आहे , आवड आहे आणि माझ्या सदिच्छा आहेत. जमेल तशी मदत मी करेनच.
मी स्वतः डॉ. पु.पां. जाखलेकर यांचे "पातंजल प्रदीप" ( अनमोल प्रकाशन, पुणे-२) हे पुस्तक वाचतो. आपण सुचवलेले संकेतस्थळही पाहिले. सुदैवाने मला गुजराथी समजत असल्यामुळे मी त्या प्रवचनांचा छान आस्वाद घेतला.