छान शब्दचित्र...गणेश. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष देत जा...
आमच्याकडेही लहानपणी गाय होती. मात्र तिचे नाव बकुळी होते की अन्य काही, हे आता आठवत नाही. बहुधा कपिला असावे....कारण लहान मुलाला जसे बहुतेक घरांतून पिंट्य़ा किंवा चिंटू हे टोपण नामाभिधान असते...तसे गाईलाही कपिला असेच असायचे...पण तुमच्या बकुळीच्या उल्लेखाने मला, माझ्याही जन्मापूर्वी आमच्याकडे असलेल्या, गाईची आठवण झाली....अर्थात मोठ्यांच्या आठवणींमधूनच ही गाय माझ्या स्मरणात जागा मिळवून बसली आहे...स्मृतिकातर करणारी कविता...
शुभेच्छा.