पूर्वी (७६ ते ८० च्या दरम्यान ... कृष्णधवल) दूरदर्शनवर भा रा तांब्यांच्या कवितांवर एक कार्यक्रम शांता शेळके, नरेंद्र शर्मा, सुधीर फडके आणि इतर काही अभ्यासक ह्यांच्या सहभागाने सादर झाला होता. त्यात भा. रा. तांब्यांची मूळ 'मधु मागसि माझ्या सख्या परी' आणि नरेंद्र शर्मांची 'मधु माँग न मेरे मधुर मीत' ही कविता दोन्ही सुधीर फडक्यांनी (पिलू रागात काहीशी पारंपरिक?) चाल लावून गायल्या होत्या. (चाल साधारण 'या दिलकी सुनो दुनियावालो ...' ह्या गीतासारखी वाटली.)
(अवांतर : त्याच कार्यक्रमात किंवा त्याच मालिकेत एका अभ्यासकाने तांब्यांच्या कवितेत हिंदी शब्द (उदा. दरी (सतरंजी ह्या अर्थी)) का आहेत असा प्रश्न विचारला होता, त्याला शांताबाईंनी "माधव ज्युलियन ह्यांनी मूळ कवितेत (हातरी) काही बदल करून तसे केले आहेत" असे सांगितले.)