मी तर म्हणतो अश्या गोष्टीत गुंतण्यापेक्षा समोरचा प्रत्येक क्षण, दिवस मजेत घालवायचा....आणि हसत शेवटापर्यंतचा प्रवास करायचा...सोबतच्या असलेल्या चांदण्याबरोबर.... याच प्रवासाला जगणं आणि त्या चांदण्याला नातं म्हणतात...म्हणजे कमीत कमी मी तरी म्हणतो ऑर मानतो....
हे आवडले. असेच जीवनाला सामोरे जावे. यालाच आशावादी दृष्टिकोन म्हणतात.
पण
निखळलेला तो प्रत्येक तारा कुठल्याश्या सरोवरात पडल्यानंतर शात होऊन आपल्या नव्या अस्तित्वात स्वछ्चंदी जगणं जगत राहीलेला चंद्रानं पाहयचं अन, त्यातच आपलं सुख मानायचं असतं." हा नियतीचा नियम आहे...नियतीचा नियम..त्याच्यापुढे माझ्यासारख्यांच काय ???
हे अजिबात आवडले नाही. एकीकडे तारुण्यातील आशावादी स्वप्निल दृष्टी आणि दुसरीकडे असा नीरस वैराग्यपूर्ण दृष्टिकोन. हे पटत नाही. जीवनाकडे पाहाण्याआ ठोस आशावादी दृष्टिकोन पाहिजे.
परंतु एकंदरीत कथा आवडली. असेच लिहीत जा. शुभेच्छा.