हे संकेतस्थळ तर मराठीतच हवे.

हिंदी आणि इंग्रजी वापरण्यामागे 'इतर भाषिकांची सोय' हेच एक कारण असते का? इतर मराठी माणसं, जी मराठी बोलत नाहीत, ती मला हसतील, अशी लाज वाटून मराठी बोलणं टाळलं जातं का?

प्रत्येक मराठी माणसाने जर स्वतःपुरतं ठरवलं की मी मराठी बोलणार आणि लिहिणार, तर हळूहळू निश्चितच फरक जाणवेल. समोरचा माणूस मराठी आहे हे मला समजल्यावर मी त्याच्याशी/तिच्याशी फक्त मराठी बोलत राहाते, मग तो/ती कुठल्याही भाषेत का बोलेना. थोड्या वेळाने तो/ती आपोआप मराठी बोलू लागतो/लागते, असा अनुभव आहे! कधी त्यावेळी ताबडतोब हा बदल होत नाही (लाज वाटत असेल) पण पुढच्या भेटीत नक्कीच आम्ही एकमेकांशी मराठी बोलू लागतो.

सुंदर