सर्वप्रथम, प्रतिसाद उत्तम आहे. धन्यवाद!

अकबराचा इस्लामखेरीज इतर धर्मांबद्दल अभ्यास दांडगा होता. केवळ हिंदू आणि इस्लाम नव्हे तर ख्रिश्चन आणि पारशी धर्माचा अभ्यासही त्याने केल्याचे दिसते. त्याच्या इबादत-खाना या दरबारात खुल्या धर्मचर्चा चालत. (इतर कोणा मुस्लिम राष्ट्रात त्या आजही चालत असाव्यात का याबद्दल शंका आहे.) तेथे नास्तिकांनाही प्रवेश होता.

अकबराच्या नवरत्नातील ५ जण हिंदू होते आणि त्यापैकी बिरबल, त्याचा वझीर, भगवानदास आणि मानसिंग सेनापती, तोरडमल अर्थमंत्री होते. इतक्या मोठ्या पदावर ज्या राजाकडे हिंदू आहेत आणि ज्यांच्यावर राज्याची मदार आहे  त्यांच्याशी सहिष्णू न राहता सम्राटपद सांभाळणे कठिण आहे. (औरंगजेबाने राजा जयसिंगाला सेनापतीपद दिले तरी त्यावर वचक ठेवायला नेहमी एक मुसलमान सेनापती सोबत दिला होता.)

कालांतराने, कोणताही एक धर्म सत्यापाशी नेण्यास पुरेसा नाही याची अकबराला जाणीव झाली आणि यातून त्याने दिन-ए-इलाही हा पंथ/ धर्म प्रस्थापित करण्याचा विचार केला. इथे गंमत अशी की आपल्या मित्राला आपले म्हणणे पटेल या हेतूने त्याने राजा मानसिंगाला त्याचा स्वीकार करण्यास सांगितला. अकबराचा मांडलिक आणि त्याला पूर्ण वाहिलेला मानसिंग, पण त्याने दिन-ए-इलाही स्वीकारण्यास साफ नकार दिला. अकबराने त्याच्यावर कोणताही दबाव आणल्याचे इतिहास सांगत नाही. यावरून त्याच्या सहिष्णू असण्याला जागा आहे असे वाटते.

त्यात अकबराने ५००० हिंदू स्त्रियांना जनानखान्यात ठेवले होते व अत्याचार केले होते असे लिहिले आहे.

अकबर सम्राट होता नाही का? त्या हिशेबात इतरांच्या स्त्रिया मोजल्या तर हिंदू राजे आणि त्यांच्या स्त्रिया, उपस्त्रिया, दास्या इ. ची संख्या तोडीस तोड निघेल.

सध्या चालू असलेली आंदोलने मूर्खपणाची आहेत. अकबर अगदी खोटारडा व नालायक राजा असला असता तरी अशा प्रकारची आंदोलने होणे चुकीचे आहे!

अगदी!!! आयुष्यात बरे उद्योग नसणाऱ्या लोकांचे धंदे आहेत.

औरंगझेबाने आणलेला धर्माचा कडवटपणा आणि अन्यायी राजवट अकबरच काय पण जहांगीर आणि शहाजहानच्या काळातही अस्तित्वात नसावी.