आपल्या प्रमुख राण्यांत मुघल बादशहांनी हिंदू स्त्रियांची नावे इतिहासात नमूद केली आहेत. अकबराची जोधा ही पत्नी नसेल पण त्याला हिंदू बायका होत्या. जोधा ही जहांगीरची पत्नी मानली तरी शहाजहान हा हिंदू राणीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा होता हे नक्की. तेव्हा हिंदू बायको आहे म्हणून तिच्या रक्ताचा मुलगा राज्याला शोभेसा नाही अशी भावना नसावी.

अनारकली खरी मानली तरी ती दासी होती. चित्रपटानुसार अनारकलीची आईही दासीच होती. दासी ही राजाची किंवा मालकाची बटीक असे. उलट ज्या राजपूत स्त्रियांशी लग्ने झाली ती राजकारणाच्या हेतूने झाली. या स्त्रिया कुलवंत मानल्या जात. अनारकली आणि लग्न करून आणलेल्या राजपूत स्त्रिया यांत हा फरक स्पष्ट आहे. एखाद्या सम्राटाने किंवा युवराजाने दासीशी लग्न करावे एवढा मुसलमानच काय पण तत्कालीन हिंदू समाजही पुढारलेला नसावा.