श्री प्रभाकर,
गेल्या आठवड्याअंती मी सेट डोसा करून पाहिला. मात्र झालं असं की, मी पोहे, तांदूळ, उडदाची डाळ वगैरे भिजत घातलं, पण रात्री ते वाटण्याच्या वेळे पर्यंत माझी मुलगी झोपली होती. ती मिक्सरच्या आवाजाने नक्कीच उठली असती. त्यामुळे मी भिजत घातलेलं सगळं न वाटताच तसंच उबदार जागी ठेवलं. सकाळी उठल्या उठल्या ते वाटून तासभरच पुन्हा उबदार जागी ठेवलं. त्यामुळे डोश्याला जाळी आली नाही, पण चव मात्र बिघडली नाही. चांगले झाले होते डोसे. तुम्हाला धन्यवाद.
-वरदा