संपूर्ण लेखात आपल्या भावना आणि परिसराचे (किंचित) वर्णन आले आहे.
प्रत्यक्ष गडाचे वर्णन, इतिहास, छायाचित्रे (कॅमेरा आणि रोलचा उल्लेख आहे, पण पुढे त्याचे काय झाले कळले नाही.)
शिवाजी महाराजांबद्दल आदर, प्रेम असणाऱ्या परंतु कुठल्या गडांना भेट देऊन 'तो' प्रखर अनुभव न घेतलेल्या/घेऊ शकलेल्यांसाठी गडाचे आकर्षण वाटावे, त्याची ओढ लागावी असे लेखन, छायाचित्रे अपेक्षित आहेत.
आपल्या भावनांचा आदर करतो, परंतु वरील मुद्यांवर विचार व्हावा ही विनंती.