हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे
ह्या ओळीतली आर्तता
बघून तुमचा देव नक्कीच प्रसन्न व्हावा. बाकी आजानुकर्णांशी सहमत आहे.
अशी 'छानशी' मुलगी दिसली की लगेच आकाशाकडे आशेने बघत"हे देवा अश्शीच दे रे. शंभर नको," असे म्हणायची माझ्या एका मिस्कील महाविद्यालयीन मित्राला सवय होती. त्याची फार आठवण आली. देवाने त्याची इच्छा पूर्ण करण्याआधीच तो बिचारा देवाघरी गेला. असो. पण त्याची ही आणि अशाच काही आठवणी आल्या की हसू काही आवरत नाही.