मुळात, मराठी पालकांचे मराठी भाषेवर 'प्रेम' असणे गरजेचे आहे. पालकांचे
मराठी भाषेवर प्रेम असेल तर त्यांनी हेच प्रेम आपल्या पाल्याच्या मनात
निर्माण होईल असे प्रयत्न केले पाहिजेत.
अगदी. ज्या मराठी घरात मराठी सर्वार्थाने मातृभाषा आहे त्या घरात मराठी आणि मराठीपण जिवंत राहीलच, राहावे असे वाटते. बाकी हे जागरबिगर मोठे शब्द आहेत. कानांना बरे वाटतात. आणि परदेशस्थांबाबत परदेशस्थच बोलू शकतील. महाराष्ट्रातल्या आंबेजोगाईची जोगेश्वरी आता रुसली आणि थेट कॅलिफोर्नियातल्या सॅन होजेला गेली (तिचे जाणेही आता जवळपास निश्चितच झाले आहे, असे कळते.) तरी चालेल. पण आंबेजोगाईत मराठी टिकली पाहिजे, असे मला वाटते.