मी या शास्त्राचा जाणकार नाही. पण काही माहीत असलेल्या व्युत्पत्ती सांगतो.
शाळेत असताना धड्यात वाचल्या होत्या. तो धडा याच विषयावर होता.
धाबे दणाणणे - पूर्वी घराच्या छपराला 'धाबे' म्हणत. अजूनही काही ठिकाणी म्हणत असतील. या धाब्यावर एखादी अवजड वस्तू पडली तर ते दणाणून जाई. ऐकणा-याला धडकी भरे. ज्याला अगदी धडकी भरवणारी भीती वाटते, त्याच्या संदर्भात 'त्याचं तर धाबंच दणाणून गेलं' असे म्हणतात.
इंगा दाखवणे - चांभाराकडे असणारे लहानसे हत्यार. त्याचा वापर करून तो खरखरीत चामडं मऊसूत करीत असे. त्यावरून 'थांब, तुला चांगलाच इंगा दाखवतो.' असे म्हणण्याची पध्दत पडली. नाठाळ माणसाला सरळ, अगदी मऊ करायचे असेल तर त्याला इंगा दाखवण्याशिवाय पर्याय नसतो.