आमचे आजोब एक गोष्ट सांगायचे ती फार मजेदार होती. त्यांच्या काळात त्यांच्या वर्गातला एक हुशार मुलगा ज्याचे नाव होते बन्या. त्याला उच्च शिक्षणासाठी मुंबई ला पाठवायचे चाल्ले होते. तेव्हा एकूणच इंग्रजी शिक्षणाची जाणीव नसलेली त्यांची आजी त्याना म्हणाली 'बन्या तू आपला मोडी शिक.' म्हणजे मारवाड्याकडे लिहायचे काम करता येईल. पूर्वी मारवाडी व्यापाऱ्याकडे लिहायची कामे करायला मराठीच लोक असत कोकणात. ही गोष्ट आमचे आजोबा मोठ्या गमतीने सांगत. कदाचित ही घटना १९४० ची वगैरे असेल.