मुद्राराक्षस डुलक्या देऊ लागताच फक्त शब्दच इकडेतिकडे होतात, तर त्याला झोप लागल्यावर काय होईल याचा नमुना :
(१) हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिला जोली गर्भवती असल्याचे वृत्त आहे, चौदा फेब्रुवारी रोजी हा करूण अपघात घडला.
(२) मोटारीखाली चिरडून एका महिलेचा, बर्ड फ्लू रोगामुळे मृत्यू झाला.
(३) भविष्यात सुमारे सात अब्ज कोटी वर्षानंतर सुर्याच्या वाढत्या तापमानामुळे, राउल यांचे मोठे बंधू फिडेल अध्यक्षपदावरून पाय उतार झाले.
(४) ऑस्ट्रेलियाचा ३७ वर्षाचा डावखुरा गोलंदाज ब्रॅड हॉगने , 'झालं गेलं विसरून जाऊ' असे सांगत सांगलीत कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.
(५) मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, शिल्पा शेट्टी अडचणीत
(६) रविवारच्या साहित्य संमेलनात, तिळे झाले असून मातेसह तिघांची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
(७) भविष्य : या आठवड्यात तुमच्या हितशत्रूंचा , विवाह होण्याचे योग आहेत.
(८) कामाच्या दबावामुळे एका राज्यात , एका पिंजऱ्यात दोन सुंदर मोर पिसारा फुलवून नाचत होते.
(९) साहित्यसुगंधाने दरवळतोय, आलू पराठा!