नंदन म्हणतो तसा सगळा लेखच कोटेब्ल झाला आहे. तुझ्या सर्व 'अनु'भवांशी सहमत आहे.
या प्रश्नांवर तोडगा म्हणून मी ' जो घातला असता आपण भिजत नाही अशा' रेनकोटाचा शोधच बंद केला आहे. (मला लाभलेला आजवरचा बेस्ट रेनकोट म्हणजे ट्रेकमध्ये तिथल्या बाजातात घेतलेली प्लॅस्टिकच्या जाऽऽऽड कापडाची बरसाती. ही मेणबत्तीच्या ज्योतीवर वितळवून तिचं इरलं करण्याचं सार्वत्रिक काम रात्री बसून केलं होतं. घरी आल्यावर तिची रवानगी वाळवणं घालायला करण्यात आली. वर "कापड चांगलं जाड आहे नाही! अजून एखाद-दुसरी नाही का आणायचीस?" ही शाब्बासकी!!!!)
पु. लं जसं कुत्र्याबद्दल म्हणतात की तो चावला जरी तरीही आपण शांत रहायचं म्हणजे त्रास कमी होतो तसा पाऊस पडतो तो आपल्याला भिजवण्यासाठीच त्यामुळे आपण भिजायचं आणि हापिसात पोचलं की हॅंड ड्रायरखाली उभं(!) राहून केस आणि कपडे वाळवायचे माफक प्रयत्न करायचे हा पावसाबद्दलचा एकमेव तोडगा आहे. बाकी सनकोटाबद्दल तर तुझं म्हणणं एखाद्या दार्शनिकाइतकं सत्य आहे. किंबहुना अंतिम सत्य आहे. अगदी आवडलं.
हातमोजे घालून गाडीचं कुलूप काढण्याची कसरत ज्या दिवशी जमेल त्या दिवशी मला कुठलीतरी दैवी सिद्धी गवसली आहे अशी माझी खात्री पटणार आहे.
हातमोजे घालून काटे चमच्यांनी लीलया अन्नग्रहण करू शकणाऱ्या पाश्चात्यांना तर दंडवतच!!
लेख अतिशय आवडला आणि पटलाही. असेच षटकार ठोकत रहा. आम्ही वाचायला उत्सुक आहोत!
--अदिती