मला ह्यावर अजून काही बोलावेसे वाटते...
जोधा ही अकबर बादशहाचीच पत्नी होती ... ह्यावर अनेक पुरावे आहेत... दिल्ली जवळ फत्तेपुर सिक्री नावच्या जागी अकबराचा एक महाल आहे... काहीसा लाल किल्ल्यासारखाच.... तिकडे जोधा चा वेगळा महाल आहे...
अकबराच्या ३ राण्या होत्या... एक हिंदू , एक मुसलमान आणि एक ख्रिश्चन ...नावे मला आठवत नाहीत कारण मी तिकडे खुप लहान असताना गेले आहे.
त्यातली हिंदू राणी म्हणजे जोधा. माहीतीसाठी पहा---->दुवा क्र. १
दुसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे
हाच प्रश्न मुघल ए आजम सिनेमाबद्दल का नाही उठवला गेला.
आणि ह्या निमित्ताने अजून एका गोष्टीवर प्रकाश टाकावासा वाटतो
कृष्णाला १६१०८ बायका होत्या हे खरे नाही...
त्या काळी विधवा, आणि काही कारणांनी पीडित किंवा गरीब स्त्रियांना ज्यांचा छळ होत असे त्यांना कृष्णा ने आधार दिला होता. त्या त्याच्या बायका नव्हत्या.
काही स्त्रियांशी त्याने लग्न केले परंतु ते ही त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावं म्हणुन.
प्रज्ञा