चित्त ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी शिक्षकांची गुणवत्ता जरी अगदी कितीही वाईट असली तरी मराठीचा 'जागर' करताना त्याचा निष्कारण बभ्रा करू नये असे मला वाटते. हिणकस गुणवत्ता खपवून घ्यावी किंवा तिचे समर्थन करावे असे मी मुळीच म्हणत नाही. किंबहुना हिणकस गुणवत्तेच्या माणसांना सतत गुणवर्धनाची ताकीद द्यायलाच हवी.

मात्र विद्यार्थ्यांना गोडी लावताना हा मुद्दा पुढे आणू नये. आणि त्या शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यच्या कामात विद्यार्थ्यांना लावायच्या गोडीचा विषय आणू नये असे मला वाटते. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या मानून वेगवेगळ्या स्तरांवर किंवा व्यासपीठांवर त्यांची हाताळणी केली जावी, असे मला वाटते.

हे कठीण आहे. (शिक्षकांच्या गुणवत्तेचा मुद्दा काढून) ज्याला हे हाणून पाडायचे आहे किंवा त्याची कुचेषटा करायची असेल तो करीलच. किंबहुना अशी कुचेष्टा होणार आहे अशी अपेक्षा धरूनच असा विवेकी पक्षपात जाणीवपूर्वक केला जावा असे मला वाटते.'