मराठी प्रेमींना नमस्कार,
वाक्यात शब्द असतात. शब्दाच्या मागे व पुढे विराम येतो तेव्हाच शब्द साकारतो. शब्दात अक्षरे असतात. दोन अक्षरांतील तटस्थता-विभक्तता-अलगपणा 'अक्षरावरील रेषे मधल्या विलगतेतून' दर्शविता येतो. केवळ मराठीलाच हे देवनागरीतून शक्य आहे. संस्कृतला हे देवनागरीतून शक्य नाही. माझ्या 'बदलत्या काळातील बदलती मराठी (मराठी अक्षर सिद्धांत)' या मराठी पुस्तकात अशा फॉण्टचा वापर मी केला आहे. त्या फॉण्टचे नाव 'गांगल' आहे. 'दोन अक्षरांमधील विराम मानवाला उमगतो व केवळ मराठीला तो लिखितपणातून (संगणकातूनही) सादर करता येतो' हे महत्त्वाचे सुत्र हा फॉण्ट मांडतो. शब्दामधील 'अक्षर' अर्थ निर्मितीमधल्या प्रवाहाचा भाषा-रेणू ठरते. अक्षराच्या अंतरंगात असणारे व्यंजन व स्वर हे भाषा-अणू ठरतात. अक्षर हे व्यंजन-स्वरातून साधले जाणारे भाषा-ध्वनी-सातत्य असते. अक्षराच्या मागे व पुढे विराम असतो. यापुढील आधूनिक काळात, हा विराम 'अक्षरावरील रेषे मधल्या विलगतेतून' मराठीने फॉण्टमधून दर्शवावा, असे मला वाटते. आपल्याला काय वाटते?
आपला स्नेही,
शुभानन गांगल