नमस्कार,

मानवाला गद्यापेक्षा पद्य भिन्न आहे हे उमगते. 'नाच रे मोरा . . . ' हे पद्य, मराठी न जाणणाऱ्या जपानी - चिनी - रशियन - युरोपीयन व्यक्ती समोर म्हटले तरी त्याला त्यातील टाळीचे ठिकाण कळते. 'टाळी' हा मानवाला उमगणारा पद्याबाबतचा एक ध्वनी-अर्थ आहे. अशा असंख्य ध्वनी-अर्थांमुळे आपल्याला गद्यापेक्षा पद्य भिन्न आहे हे उमगते. 'रदिफ व काफीया' हे असेच पद्य-ध्वनी-अर्थ आहेत. 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' या मराठी सॉफ्टवेअर मधून गझलमधील 'रदिफ व काफीया', अक्षरांना अनुक्रमे लाल व निळा रंग आपोआप येऊन ते दाखवले जातात. यात गझलमधील प्रत्येक ओळ संगणक साडे-बावीस लाखवेळा दर सहा सेकंदाला तपासतो, तसेच सालिम आणि उप-छंद यांची नावेही शोधून सादर करतो. 'रदिफ व काफीया' यांचा मराठी अर्थ 'नियमित व अभिजात' अशा पद्धतीतूनही यातून उलगडून दाखवला आहे.

मराठी पद्यात अष्ट-गण तर उर्दूत दश-गण पद्धती वापरली जाते. प्रत्येक भाषेला उमगणारा, पाळता येणारा पद्याचा आविष्कार त्यातील अक्षरानुसार भिन्नपणे सामोरा येतो. केवळ मराठीभाषा विविध भाषांतील पद्य-गुणांना ओळखून सादर करू शकते. ज्या विविध गुणांमुळे मी मराठीला सर्वश्रेष्ठ म्हणतो त्यातील हाही एक गुण आहे. जगातील कोणत्याही भाषेतल्या पद्यातील 'स्वर-काफिये' मराठीभाषा 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' या सॉफ्टवेअर मधून दर्शवते. याच्या निर्मितीसाठी मला १५ वर्षे लागली. यातून कविता गझलेच्या अंगाने आणि गझल कवितेच्या अंगाने तपासता येते. अधिक माहितीसाठी ९८३३१०२७२७ किंवा ९१-२२-२६२०१४७३ वर संपर्कसाधा. अथवा दुवा क्र. १ वर लिहा.

आपला स्नेही,

शुभानन गांगल