प्रिय पराग जोगळेकर यांस, सप्रेम नमस्कार.
'या चर्चेत केवळ या लेखाविषयीची चर्चा व्हावी' ही सूचना मिळाली. मनोगतातून, केवळ काही पानांतून, 'फास्ट-फुड' सारखे 'फास्ट-संवृत्त आणि विवृत्त अक्षर सिद्धांत' मांडणे शक्य होणार नाही. या 'संवृत्त आणि विवृत्त अक्षर सिद्धांतावर' मी ग्रंथ लिहिले आहेत. मला तो उमगल्यावर त्यानंतरची १५ वर्षे त्याची योग्यता तपासण्यात मी घालवली. यासाठी मानवी जीवनाचे चार भाग मी केले, १) जन्म ते भाषा शिकणे, २) गद्य, ३) पद्य, ४) संगीत. त्यातल्या पद्य या विभागावर या सिद्धांताचा वापर करून 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' हे मराठी सॉफ्टवेअर निर्माण केले. यात मराठी टाईप केलेत तर संगणक 'टाईप केलेले गद्य आहे की पद्य' ते ओळखायला लागतो. वृत्त-जाती-छंदांच्या नावासह तो काव्यगुण सादर करतो. ११७१ वृत्ते, ५९१ जाती, ८३ छंद तो ओळखतो. कवितेची प्रत्येक ओळ संगणक साडे बावीस लाख वेळा दर सहा सेकंदात तपासतो. त्यातून त्याला 'विवृत्त अक्षर सिद्धांतावर' आधारलेल्या सूत्रातून 'अनंत कविता व जगातील कोणत्याही भाषेतील कविता' ओळखता येतात. मराठी-विवृत्त-अक्षर विविधतेतून तपासल्यानंतरच मला आज १५ वर्षानंतर 'मराठी अक्षर सर्वोत्तम आहे' असे खात्रीपुर्वक सांगता येत आहे. त्यासाठीचा प्राथमिक तक्ता मी आज सादर करत आहे.
यावर आपण विचार करून संस्कृत व मराठी अक्षरातील भेद लक्षात घ्यावा आणि त्याचा 'वापर व उपयोग' मराठीने यापुढे आपल्या लेखन-नियमात आणि व्याकरणात करून घ्यावा असे आपणास वाटते का ते कळवावे.
आपल्या सर्वांचा स्नेही,
शुभानन गांगल