आयुष्याच्या मध्यावरती
.
.
आयुष्याच्या मध्यावरती
माझ्या जीवनात तू आलीस
सरत्या या भावनांना थांबवून
काळालाही मागे घेऊन गेलीस
थरथरत्या हाताला प्रेमाच्या स्पर्शाने
संजीवनी तू दिलीस
शेवटच्या या प्रवासातही
सहजीवनी होऊन गोडी तू आणलीस
आयुष्याच्या मध्यावरती
माझ्या जीवनात तू आलीस
सरणावरती जाईपर्यंत
माझीच होऊन रहाण्याची
शपथ तू वाहिलीस
आयुष्याच्या मध्यावरती
माझ्या जीवनात तू आलीस
कोमेजलेल्या फ़ुलावरही
मायेने चेतना तू आणलीस
आयुष्याच्या मध्यावरती
माझ्या जीवनात तू आलीस
------ गणेशा