प्रिय गांगल सप्रेम नमस्कार,
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.
त्यातून जाणवलेल्या काही गोष्टी :
१. आपल्या ग्रंथांची सूची / कोठे उपलब्ध आहेत त्याची माहिती द्याल का ? (मी पुण्यात राहत असल्याने अप्पा बळवंत चौकात जाणे मला शक्य आहे)
२. 'कविता-आस्वाद आणि गझल-आस्वाद' या सॉफ्टवेअर चा दुवा द्यावा. ते ऑनलाईन विक्रीस आहे किंवा कसे ते सांगावे.
३. आपल्या लेखाविषयी किंवा त्यातील मिलिंद फणसे यांनी विचारलेल्या गोष्टींविषयी आपले मत काय आहे ते समजले नाही. किंबहुना, सूचना मिळूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यावरून आपणास त्यात रस नाही असे समजावे काय?
अवांतर : आपण दिलेल्या दुव्यात, जो भाषेविषयक आहे, त्यातही जाणीव शब्दाचे अनेकवचन चुकीचे असावे ही गोष्ट खटकली.
आपला स्नेही,
पराग जोगळेकर