श्री माननीय शुभानन गांगलसर,

मला त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर आहे जीने मराठी भाषेकरिता समरसून काही प्रयत्न केला आहे आपणही असा काही प्रयत्न केला आहे त्या बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे ऋण मान्य करतो.

आपण म्हणता तसे कदाचित मनोगत फास्टफूड सेंटरातील उभ्या उभ्या केलेल्या  चर्चात आपणांस पुरेसे गांभीर्य आणि खोली जाणवत नसेल तशी आमची आंतरजालीय पाड्यातन वसणारी मायबाप जनता जनार्दन पेक्षा माझी बुद्धी भाषाशास्त्रात अल्प आहे हे कबूल करून, मला गरीब पामराला असे सांगावेसे वाटतेकी सध्या तरी मला आपले पुस्तक घेता येईल का याची कल्पना नाही. मनोगत फास्टफूडातली जागा किती जरी कमी असली तरी जे काही ज्ञानार्जन करावयाचे ते मनोगतातून यास खरे तर आज तरी माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही(तसा विकिपीडिया आहे पण तेथील नियमवालीत येथील मासलेवाईक मोकळे पणा मिळत नाही!).तेव्हा या   छोट्याश्या जागेत आपले पाय लागलेच आहेत तर आपले म्हणणे सविस्तर मांडून जा.

माझ्या अल्पबुद्धीस आपले म्हणणे मला अद्यापि तरी उमगलेले नाही हे प्रांजळपणे कबूल करावेसे वाटते.तसेच माझ्या अल्पमतीस जे काही प्रश्न पडले आहेत त्यांची कोणतेही पुस्तक विकत न घेता उत्तरे देणे शक्य झाले तर पाहावेत ही नम्र विनंती.

१) मराठी फाँट जगातील सर्वोत्तम आहे (या माहिती बद्दल धन्यवाद) ...(मग वेगळा गांगल फाँट का हवा ?) मराठी फाँटाच्या अमराठी भाषांत प्रचाराचे आपले काही प्लान आहेत काय आणि असतील तर ते कोणते , म्हणजे जगातल्या इंग्रजी, चिनी,फ्रेंच जपानी, अरेबिक या भाषांनी मराठी फाँट वापरण्याकरिता नेमके काय करावे?

२)मला गांगल फाँट वापरण्याकरिता कोणत्या प्रकारचा काँप्यूटर वापरावा लागेल

३) गांगल फाँटास विंडोज एक्सप्लोरर चालते का ? का मोझीला बरा ?

४) ओ एस माझ्याकडे विंडोज एक्सपी आहे त्यावर गांगल फाँट चालतो का? 

 ५) मराठी फाँट प्रकारात दोनच फाँट ऐकून आहे ते दोन वेगळे आहेत का एकच हेही मला माहीत नाही , एक तर मंगल नावाचा फाँट आणि दुसरा आपला मनोगत स्पेशल फाँट  या दोन फाँटाच्या तुलनेत आपण म्हणता तो मराठी फाँट आणि गांगल फाँट तुलनात्मक वेगळे कसे आहेत?

६) संस्कृत फाँटाशी , भोजपूरी फाँटाशी , कोकणी फाँटाशी , राजस्थानी फाँटाशी तुलनात्मक दृष्ट्या मराठी फाँट कसा कसा वेगळा आहे.

७) चिनी फाँटात जपानी फाँटात फ्रेंच फाँटात आणि मराठी फाँटात काय फरक आहेत      

माझ्या प्रश्नांचा रोख आपली परीक्षा पाहण्याचा नाही खरेच माझे ज्ञान अल्प आहे आपल्या मार्गदर्शनामुळे त्यात काही सुधारणा झाली तर बरे !

आपला नम्र

विकिकर