अनेक सदस्य विसर्ग उमटवण्यासाठी कोलन ( : ) चा उपयोग करीत आहेत. हे अयोग्य आहे. कोलन ( अपूर्णविराम ) हे एक विरामचिन्ह आहे. तो देवनागरी वर्ण नाही. विसर्ग हा देवनागरी वर्ण आहे.
विसर्ग उमटवण्यासाठी H (कॅपिटॉल एच) चा वापर करावा. देवनागरी टंकलेखन साहाय्याच्या तक्त्यात तसेच दाखवलेले आहे.
विसर्गाचा उच्चार काहीसा ह् असा होतो, हे लक्षात ठेवल्यास H लक्षात राहणे कठीण जाऊ जये.
उदा. स्वतःचा हा शब्द उमटवण्यासाठी svatHchaa असा कळक्रम वापरावा.
कळावे.