कथा खरोखरच प्रभावी आहे..

पण 'गरीब असूनही खालच्या जातीचा नसल्याने ...' याची खरोखरच गरज होती काय? शिवाय "खेडवळ उच्चार आहेत म्हणून वक्तृत्व स्पर्धेतून बाद, सुभाषिते/श्लोक वापरता येत नाहीत म्हणून निबंधात बाद, समान उंचीत अक्षरे येत नाहीत म्हणून हस्ताक्षरातून बाद...  बाद, बाद, बाद...  इथली मुले घरीच सुभाषिते शिकून येत. मुक्याच्या तर बालाही सुभाषिते येत नव्हती. " अशी वाक्ये त्याच परिच्छेदात आल्याने थोडासा संभ्रमही झाला. शिवाय मुक्याचे मुकुंद पुजारी करणे थोडे अवास्तव वाटले. तोच मुकुंद पाटिल असू शकला असता. असो. या साऱ्याने मूळ विषयावरून लक्ष थोडेसे बाजूला गेल्यासारखे वाटले इतकेच.

मी आशुतोष