मराठीच्या प्रगतीसाठी मराठी भाषकांनी फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे इतर भाषांसकट मराठीवर प्रेम!  इंग्रजी शाळेत मराठीची सक्ती केली तर त्यांचा दर्जा नक्कीच खाली उतरेल.  अशी सक्ती उर्दू माध्यमाच्या शाळांत करायची हिंमत आहे का? आज महाराष्ट्रात अनेक आंतरराष्ट्रीय शाळा आहेत.  तिथे इंग्रजी, फ्रेंच वगैरे माध्यमातून शिकता येते. तिथेपण मराठीची सक्ती करता येईल? मराठीतून  विज्ञान, रसायन, जीवशास्त्र शिकणे यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.  आज जर वैद्यकीय महाविद्यालयातून मराठी माध्यम झाले तर देशातले डॉक्टर-नर्स एकमेकांशी संवाद साधू शकणार नाहीत आणि हाहाकार उडेल.

मराठी माणसाने मराठीवर प्रेम करावे, आणि आपल्या मुलांना घरी मराठीत आणि बाहेर इतर भारतीय भाषांत बोलू द्यावे. याने सर्व प्रश्न चुटकीसारखे सुटतील.