...लोकसंख्या आटोक्यात आली तर !! .... हा विषय आता स्वप्नवत वाटतोय...

मग देशासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. प्रत्येक नागरिकाने याबाबत विचर करायलाच हवा. सरकारनेही पावले उचलायला हवीत. सध्या सुरू असलेल्या भाषा/प्रांतीय वादाचे मूळ कारण ही अनियंत्रित वाढणारी लोकसंख्या हेच आहे. लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. अगदीच खुप मजबूरी असेल तर एखाद-दुसऱा गुंडगिरी कडे वळतोही. हे घातक आहे. साधा सरळ हिशेब आहे. जागा (राहाण्याचीही आणि नोकऱ्यांसाठीच्याही) कमी आणि माणसे जास्त झाली आहेत. कसे थांबणार हे? दर्जेदारपणा आणि संख्या हे विषम प्रमाणात असतात. क्वालिटी आणि क्वांटिटी आर इन्वर्सली प्रपोर्शनल. लोकसख्या कमी तर दर्जेदारपणा जास्त. इतर देशांमध्ये रस्त्यावर अपघात क्वचीतच होतात. लंडनच्या लोकल ट्रेन्स मधून पडून मृत्यू असे कधी ऐकीवात नाही. पडला तरी जबाबदार लोकांन धारेवेर धरले जाते. शिक्षा होते. आपल्या येथे मुंबईत रोज किती माणसे पडून मरतात. इतर सगळे  बधीर होवून आपापल्या मार्गी चालू लागतात. अशी माणसांची अवस्था का झाली? खुप अस्वस्थ व्हायला होते हे ऐकून, बघून. दादर स्थानाकावर हे भरपूर गर्दी. का?

लोकसंख्या जास्त अससल्यामुळे आणि भारतात एकजिनसीपणा (वरील काही प्रतिसाद वाचावेत. एकजिनसीपणाच्या संदर्भात. ) नसल्यामुळे नोकरभरतीत प्रमाणाबाहेर भ्रष्टाचार झाला आहे.

माणसांच्या मुंग्या होवून चिरडल्या जाव्यात की माणसे कमी पण महत्त्वाची असावीत? महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे हा.

कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर गेली की त्याची माती होते. आता वाढलेल्या लोकसंख्येच्या ज्या पायरीवर आपण उभे आहोत, ती पायरी विनाशाच्या खाईत पडण्यापूर्वीची शेवटची पायरी तर नाही ना? जर याचे उत्तर हो असेल तर?