भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

"असे शेरे मागे बसलेल्या नायिकेवर सिग्नल तोडून इंपो टाकणार्‍यावर मारता येतात."
हे पुणेरी भाषेतले नाही, सर्वसामान्य भाषेतले वाक्य आहे. एखादा नुकताच प्रेमात पडलेला तो आणि नुकतीच प्रेमात पडलेली ती असतात. तो आणि ती यांचे लग्न ठरलेले/ किंवा तो आणि ती वसतीगृहात राहून कॉलेजात शिकणारे किंवा इतर अनुकूल परिस्थितीतले असतात. आपण किती 'डॅशिंग,डेअरिंग' आहोत हे तो 'ती' ला आणि आपण किती शालीन, निरागस, नाजूक आहोत हे ती त्याला दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. अशावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या आपल्या 'ती' वर पोलीसाची नजर चुकवून सिग्नल तोडून छाप उर्फ इंपो टाकणे, गाडी चुकीच्या गियरमध्ये ठेवून तिचा रेसर बाईकसारखा मोठा 'ड्राँव, ड्रॉव' आवाज काढणे हे प्रकार तो सारखा करत असतो. तिला पण 'अय्या कित्ती मॅनली ना!!' वगैरे वाटत असतं. (लग्न होईपर्यंतच, नंतर आहेच, 'गाडी नीट चालव, काहीतरी बळंच धाडस करू नकोस, मागच्यावेळसारखं ट्रॅफिक मामाने थांबवून झापलं तर मी रिक्षा करून निघून जाईन,मला उशिर होतो' इ.इ.)