प्रिय मिलिंद फणसे,
आपले पत्र व त्यातील प्रश्न मिळाल्यामुळे माझा 'मराठी अक्षर सिद्धांत', मनोगतात मांडावा असे वाटले. 'मराठी अक्षर सिद्धांत' वाचल्याशिवाय व कळल्याशिवाय सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. तरीही आज वेळ मिळाल्याने, आपल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देत आहे. सविस्तर उत्तरे मिळण्यासाठी आपली भेट झाली तर मला आवडेल. मी 'माझ्या पत्ता, फोन' नेहमीच सर्वांना देतो.
१) "मराठी शुद्ध लेखनात चूक न होणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे."
'शुद्ध' व 'अशुद्ध' म्हणजे काय? ते मराठीसाठी कोणी ठरविले? जे ठरवले गेले ते मराठीसाठी नव्हतेच. मराठी अक्षराची ओळखही झालेली नसताना हे नियम मांडले गेले. मराठीला अजून 'मराठी अक्षराचीच' ओळख झालेली नाही म्हणून त्यातील 'शुद्धलेखन' शुद्ध लेखन ठरत नाही.
२) "अर्थाला नेहमीच पूर्णत्व असते. अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचे पूर्णत्व लाभलेले असते."
'अर्धवट किंवा पूर्ण' अशी बाधा अर्थाला नसते. प्रत्येकाला उमगलेला अर्थ त्या त्या व्यक्तीसाठी त्या वर्तमानकालापुरता योग्यच असतो. वर्तमानकाल हा बिंदू नसतो. ते सुरवात व शेवट असणारे 'अंतर' असते. वाहते ती ऊर्जा व त्याची जाणीव होते तो अर्थ असतो.
३) "सर्वांच्याच नेहमी चुका घडत असतील तर ती चूक न ठरता तोच भाषा नियम ठरतो."
'एखादी विशिष्ट चूक' यापुरते ते मर्यादीत नाही. बऱ्याच चुकांच्या उद्भवाचे कारण एक असू शकते.
४)"संस्कृत भाषेचे भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरल्याशिवाय त्यांना मराठीचे मीपण समजणार नाही."
मराठीचा स्वतंत्र वेगळा विचार 'शुद्धलेखन व व्याकरण' यात आजवर मराठीने केलेला नाही. मराठी 'शुद्धलेखन व व्याकरण' यात संस्कृत भाषेचा आधार घेण्याची काडीमात्रही गरज नसताना तसेच केले जात आहे. 'मराठीतल्या मराठीपणाची जाणीव', संस्कृत भाषेचे भूत व्याकरणकारांच्या मानगुटीवरून उतरल्याशिवाय त्यांना व त्यामुळे इतरांना होणार नाही. 'मराठीतल्या मराठीपणाची जाणीव' म्हणजे 'मराठीचे मीपण' होय. 'शुद्धलेखन व व्याकरण' आमूलाग्र बदलणे क्रमपात्र ठरते.
५) "मग त्यांनी ग्राह्य धरलेली भाषेसाठीची गृहीते कोणत्या क्षितीजापर्यंत पोहोचतील ? आणि "चुकीचे पुस्तकी व्याकरण व चुकीचे पुस्तकी लिखित नियम नावाच्या हसविणाऱ्या आरशांमधून मराठी भाषेला आज आपले विद्रूप रूप बघावे लागत आहे." आणि "व्याकरण व लेखननियम यातील चुका आता इतक्या वर्षांनंतर बदलायच्या ठरविल्या तर त्याचे परिणाम छापून प्रसिद्ध झालेल्या आजवरच्या पानापानांवर किती होईल, या विचारात सरकार मग्न राहील." आणि "...आम्ही मराठी जसे वापरत होतो तसेच ते आता अधिकृतपणे वापरता येईल..." आणि "झालेल्या चुकांची कात टाकून नव्या उजळत्या कांतीने मराठीने स्वतःचा कायापालट करावा."
आपली विधाने, वरील वाक्यांतील अर्थाबाबत नसून त्यात मी वापरलेल्या शब्दात आपल्याला भासणाऱ्या चुकांबाबत आहेत. आपल्याला वाक्यातील अर्थ कळला असावा असे वाटते. वाक्यांचा अर्थ कळला नाही असा उल्लेख आलेला नाही.
६) "जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल." आणि "त्यामुळे संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल."
यातील 'म्हणजे काय ? ' आणि 'कशी' याची उत्तरे एका लेखात देता येतील असे आपल्याला वाटते कां? आजवर मराठी अक्षर संस्कृतपेक्षा वेगळे आहे हेच कोणालाही माहीत नाही. त्यासाठीच मी 'मराठी अक्षर सिद्धांत' लिहीला आहे, याची जाणकारांनी नोंद घ्यावी. माझ्या लेखातून 'मराठी अक्षर सिद्धांताची' प्राथमिक ओळख करून दिली आहे. गेली १५ वर्षे हा सिद्धांत 'चुकीचा आहे का?' यात खर्च केली. १५ वर्षांनंतर तो मांडत आहे.
७) "मराठीच्या अक्षर निर्मितीचा संबंध भौतिकविज्ञान, गणित, कालमापन, भाषाविज्ञान या सर्वांशी आहे, हे कळल्यावर, मराठी भाषेला जगातील एकमेव शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळेल."
याबाबतची आपली प्रतिक्रिया, '''' लेखात सलग आलेली वरील तीन वाक्य शालेय वाद-विवाद स्पर्धेत टाळ्या वसूल करण्यासाठी घातलेल्या वाक्यांसारखी वाटतात. पण एका शास्त्रीय, तांत्रिक लेखात असली शेंडा-बुडखा नसलेली, कोणत्याही पुराव्याचा आधार नसलेली वाक्य शोभत नाहीत. मराठी भाषेवर गांगलांप्रमाणेच माझे ( व येथील साऱ्या सदस्यांचे) प्रेम आहे, आमच्या ह्या मातृभाषेचा आम्हांस रास्त अभिमानही आहे. पण शेवटी अतिशयोक्ती किती करावी याला काही सुमार ? "जगातील एकमेव शास्त्रीय भाषा" ?! '''' अशी आहे. वरील सर्व वाक्ये 'पुराव्याचा आधार असलेली' आहेत. तशी ती न वाटण्याएवढी ''अतिशयोक्ती पूर्ण आपल्याला वाटतात. यातूनच, त्याबाबतचे विवेचन 'फास्ट-फुड' सारखे नसेल हे पटावे असे वाटते.
त्यातील प्रत्येक गोष्ट सिद्ध करता येते. त्यासाठी 'मनोगत' हे व्यासपीठ योग्य ठरणार नाही. 'मनोगता'तील मान्यवरांपर्यंत यातील मजकूर बातमी म्हणून पोचला आहे. सविस्तर माहिती देण्यासाठी कोणते व्यासपीठ योग्य ठरेल ते आपण सुचवावे. सर्वांनी एकत्रितपणे मराठीचे हे आज 'अतिशयोक्ती पूर्ण' वाटणारे पण सत्य असलेले 'मी-पण', यापूढे उपभोगावे असे मला वाटते. यासाठीच 'मनोगत' येथे वेळ काढून आज आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे.
आपला स्नेही, शुभानन गांगल
१९/२० आयडियल आपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९
फोन : ९१-२२-२६२०१४७३, सेल : ९८३३१०२७२७, ईमेल : दुवा क्र. १