त्या काळी किती पुढे गेले होते पाहा. सुभद्रेच्या शरीरातील गर्भाचे रोपण द्रौपदीच्या शरीरात केले होते. होते कुणाचे तंत्रज्ञान त्या काळी एवढे प्रगत? एकदा बसच्या रांगेत माझ्या मागे हिंदी शाळेतील एक थोर शिक्षक होते. त्यांच्या बरोबरचा माणूस त्यांना मास्टरजी म्हणत होता. जहांगीरने इतना अच्छा ताजमहाल कैसे बांधा होगा असा त्या थोर शिक्षकाला प्रश्न पडला होता.