ड्रॉफ्ट्समन ह्याला मराठी प्रतिशब्द आहे आरेखक. अभियांत्रिकी शास्त्राची भाषा म्हणजे आरेखन. चित्रकार आपल्या कल्पना जशा मुक्तहस्त चित्रातून मांडतो त्याच प्रकारे आरेखक आपल्या कल्पना सेट स्क्वेअर (गुण्या) आणि टी स्क्वेअरच्या (इंग्रजी 'T' च्या आकारात काटकोनात जोडलेल्या दोन पट्ट्यांच्या) मदतीने मोजमाप करतो आणि गुणोत्तरात (स्केल मधे) कागदावर मांडतो.
कुठल्याही घनाकृतीस सहा बाजुने पाहीले असता तिचा पुर्ण आकार दृष्टिपथात येतो. या सहा बाजू पैकी समोरासमोरच्या बाजुने पाहीलेला देखावा हा आरशातील प्रतिबिंबा प्रमाणे असतो म्हणून फक्त तीन देखावे (टॉप ,फ्रंट,साईड व्ह्युव) हे आरेखनासाठी पुरेसे असतात. हयाला 'ऑरथोग्राफीकल व्ह्युव' म्हणतात. ह्याचेच पुढे दोन प्रकार पडतात. एक 'फर्स्ट ऍन्गल व्ह्युव' आणि दुसरा 'थर्ड ऍन्गल व्ह्युव'
फर्स्ट ऍन्गल व्ह्युव :- या मध्ये लक्ष (ऑब्जेक्ट) समोरून पाहून त्याचे चित्र मात्र मागच्या बाजुने कसे दिसेल याची कल्पना करून ते कागदावर मांडायचे. अर्थात वर लिहील्या प्रमाणे तिन्ही देखाव्यात (टॉप ,फ्रंट,साईड व्ह्युव) जुन्या काळात पाश्चात्य देशात ही पद्दत वापरत. दुवा क्र. १
थर्ड ऍन्गल व्ह्युव :- या मध्ये लक्ष (ऑब्जेक्ट) समोरून पाहून त्याचे चित्र मात्र समोरच्याच बाजुने कसे दिसेल याची कल्पना करून ते कागदावर मांडायचे. हे ही तिन्ही देखाव्यात (टॉप ,फ्रंट,साईड व्ह्युव). ही पद्दत आपण वापरतो. दुवा क्र. २
टॉप ,फ्रंट,साईड हे तिन्ही देखावे एकमेकांशी सल्लग्न असतात. एका देखाव्यातील बदल हा दुसऱ्या देखाव्याला पूरक असा असतो. एका देखाव्यात केलेला बदल हा दुसऱ्या देखाव्यात कसा दर्शवता येईल ही कल्पनाशक्ती म्हणजेच इमॅजिनेशन.
या शिवाय अजून एक आरेखनाची पद्दत आहे ती म्हणजे 3D व्ह्युव. यालच आयसोमेट्रीक व्ह्युव असेही म्हणतात. ह्या पद्दतीत चित्र काढताना टॉप, फ्रंट आणि साईड ह्या तिन्ही बाजू एकाच देखाव्यात दिसतात. ३० आणि ६० ह्या अंशात हे चित्र बनते. ह्या प्रमाणे.. दुवा क्र. ३
ड्रॉईंग पेपरचे A0, A1, A2, A3, A4, A5 असे त्याच्या आकारानुसार प्रकार आहेत. ह्यात A0 म्हणजे सर्वात मोठा आणि A5 सर्वात लहान. हाताळण्यासाठी सोईचे जावे म्हणून वेगवेगळ्या गुणोत्तरी चित्रासाठी तत्सम आकाराचे कागद वापरतात.
A0 1189 x 841 mm 46.81 x 33.11 inch
A1 841 x 591 mm 33.11 x 23.39 inch
A2 594 x 420 mm 23.39 x 16.55 inch
A3 420 x 297 mm 16.55 x 11.69 inch
A4 297 x 210 mm 11.69 x 8.27 inch
A5 210 x 148 mm 8.27 x 5.84 inch
A6 148 x 105 mm 5.84 x 4.13 inch
लिहीलेली माहीत अगदीच ढोबळ आहे. अजून सविस्तर माहीती हवी असल्यास श्री एन डी भट यांचे एलिमेंट्री इंजिनीअरींग हे पुस्तक वाचावे. ह्या क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना समानार्थी शब्द मला फारसे सुचले नाहीत या बाबत दिलगीर आहे.
हेमंत पाटील.