सीतापति,
कवितांच्या विभागात आपले स्वागत.
पदार्पणातच छान कविता वाचायला दिलीत.
पाखरे गत संचिताची
पंख झटकुनी उडाली
रिक्त काळेभोर उघडे
फक्त माथी आसमान
हे क़डवे फार आवडले.
छंदांची, वृत्तांची सरमिसळ टाळता आल्यास पाहा. लयीकडेही लक्ष द्यायला हवे.
असे समजा की, तुमची ही कविता ताजमहालासारखी आहे. (आशयाच्या दृष्टीने हे प्रतीक घ्या.) मग अशा या ताजमहालावर पौर्णिमेचे टिपूर चांदणे (वृत्त, छंद, नाद, लय, गेयता या तांत्रिक अंगांच्या दृष्टीने हे प्रतीक घ्या.) पडले, तर बहार नाही का येणार ?
एरवी ताजमहाल सुंदर दिसतोच; पण चांदण्यात तो अधिक खुलून दिसतो!!! वृत्तबद्ध, छंदोबद्ध, गेय कवितांच्या बाबतीत ही (छोटीशी) बाब ध्यानी धराल तर तुमच्या कविता अधिक चांगल्या होतील. असो. मनापासून शुभेच्छा. येऊ द्या पुढची कविता... !