अगदी सुरेख पटण्यासारखे स्पष्टीकरण आणि सहज करून पाहाता येण्यासारखा उच्चारण प्रयोग!  कल्पनाविलास कधीकधी प्रत्यक्षात उतरतो असे दिसते आहे.

काहीजणांना ङ आणि ञ या अक्षरांचा उच्चार जमत नाही.  त्यांच्यासाठी सोपी युक्ती.  'ग'चा नाकात उच्चार केला की ङ ऐकू येतो, आणि झ(झ्य)चा नाकात उच्चार केला की ञ ऐकू येतो.  गरजूंनी करून पाहावे.

इंग्रजी शब्दात सुरुवातीला आलेल्या ट चा उच्चार मराठी ठ सारखा ऐकू येतो.  'टॉक्' हे 'ठॉक्'सारखे.  इंग्रजी ट चे उच्चारण एरवी, मराठी ट-त यांच्या मधले, हे वर आलेच आहे.