श्री. हेमंत पाटील ह्यांनी अतिशय समर्पक आणि विस्तृत उत्तर दिलेले आहेच.
त्यात माझीही थोडीशी भर.
टॉप = वरून, वरील
साईड = बाजूने, बाजूचे
फ्रंट = समोरून, समोरील
ऑर्थोग्राफिकल = लंबारेखन (पद्धती)
व्ह्यू = दृश्य
ए० (A0) आकार हा अशावरून ठरला आहे की कागदाचे क्षेत्रफळ एक वर्ग मीटर असावे आणि लांबीत अर्धा केल्यावर प्रत्येक तुकड्याचे क्षेत्रफळ अर्धे तर व्हावेच, शिवाय त्यांचे आणि मूळ कागदाचे पैलू गुणोत्तर (aspect ratio) एकसारखेच राहावे. असे केल्याने एक वर्ग मीटर क्षेत्रफळाच्या मोठ्या कागदाच्या लांबीत घडी घालत घालत पाच घड्या घातल्यास ३२ पानांचे सर्वसामान्य पुस्तकाच्या आकाराचे पुस्तक बनते आणि चारही बाजू कापून त्याचे सहजच पुस्तक बनवता येते. ते ए५ (A5) आकाराचे असते.