मलाही चारुशीला पटवर्धनांचे श आणि ष चे वेगळे उच्चार स्पष्ट आठवत आहेत. विशेषतः एका बातमीपत्रात त्यांनी म्हटलेले "त्याच्या शतकात दोन षटकार होते." हे वाक्य त्यातील श आणि ष च्या वेगवेगळ्या उच्चारामुळे मला अजून आठवत आहे!
(ष हे अक्षर ट वर्गातील अक्षरांप्रमाणे तालव्य आहे असे मी शिकले आहे. तेव्हा ष म्हणताना जीभ टाळ्याला लावायलाच पाहिजे.)