शुभाननजी ,
लेखामध्ये व्यक्त केलेल्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपले मत व्यक्त केले याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपण सांगितलेला मुद्दा नक्कीच योग्य आहे. पण मग ही दोन अक्षरातील तटस्थता-विभक्तता-अलगपणाची गरज देवनागरीला खूपच जवळ जाणाऱ्या गुजरातीलाही जाणवायाला हवी.पण तसे आढळून येत नाही.
शिरोरेषा ही लिपीच्या सौंदर्यात भर घालते हे नि:संशय.काहीवेळा इंग्रजीमध्ये संस्कृतमधील श्लोक लिहायचे असतील तर त्या इंग्रजी (रोमन) अक्षरांवरही शीरोरेषा आखलेली आपण पाहतो तसेच पूर्णविरामाऐवजी दंड वापरला जातो ज्यायोगे संस्कृत भाषेसारखा परिणाम साधला जावा.
खालील दुव्या मध्ये विविध लिपींमध्ये मनोगत हा शब्द लिहिला आहे. यात सर्वात खाली शिरोरेषा विरहित देवनागरी मध्ये लिहिले आहे.
येथे पहा.
(दुव्या शिवाय थेट चित्र कसे दाखवता येईल? जसे वादळभूमी मध्ये दाखवले आहे..) कृपया मार्गदर्शन करावे.
पुनः धन्यवाद!
- मंदार
(a ऐवजी img टॅग वापरल्यास चित्रप्रतिमा थेट दिसू शकेल. असा बदल आता वर केलेला आहे : प्रशासक)