विनायक दोन्ही लेख अतिशय आवडले. विषयाचा अतिशय गोळीबंद आढावा घेतला आहे. शिवसेनेने मराठी माणसाचे सत्व जागवले यात काही शंकाच नाही, पण त्याचे रूपांतर एक सक्षम, मजबूत मराठी समाजात होऊ शकले नाही. त्यामुळे मराठी समाज सतत करवादणारा, भांडणारा असेच राहिले. त्याच्या ठोस आर्थिक उत्थानासाठी काहीच केले गेले नाही.
दक्षिणेतल्या लोकांची अस्मिता बुलंद करण्यात तेथील भाषांचे मोठे योगदान आहे, असे मला वाटते. या भाषा उत्तरेकडील भाषांपेक्षा अत्यंत वेगळ्या आहेत. बोली म्हणूनही आणि लिपी म्हणूनही. या तुलनेत मराठीचे तसे नाही. मोडी फेकून देऊन देवनागरी लिपी अवलंबल्यामुळे आपल्यात भाषेबद्दलची अस्मिताच राहिली नाही. हिंदी सहज कळते, समजते म्हणून आपण ती सहज स्वीकारली. (त्याचे काही फायदेही झाले.) पण मराठी संस्कृतीची अस्मिता तयार झाली, तरी ती भाषेच्या बाबतीत होऊ शकली नाही. उत्तर दिग्विजयाच्या निमित्ताने मराठे यापूर्वीच उत्तरेकडे गेल्याने आपल्याला उत्तर भारत काही वेगळा वाटला नाही.