इतरांनी म्हटल्या प्रमाणे लेख उत्तमच झाला आहे. शिवसेना हा महाराष्ट्राचा चेहरा बनला होता. शिवसेने बद्दल विचार करताना अनेक प्रश्न उभे होतात आणि त्यांची उत्तरे मिळत नाहीत. ती कदाचित आज थकलेले बाळासाहेब ठाकरेच देऊ शकतील.
शिवसेना मोठी न होण्याचे कारण शिवसेनेचा जन्म आणि सुरुवातीची वाढ हे ही असेल. मुंबई = शिवसेना हे सर्वांना मान्य आहे. पण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार होतो त्यावेळी मात्र शिवसेनेची सुरुवातीची वाढ हि मुडदूस झालेल्या रोग्यासारखी वाटते. हा पक्ष मुंबई मध्ये फोफावला पण शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात आपला जम कधीच बसवू शकली नाही. अगदी नेते आयात करून सुद्धा. तिथे पक्ष कोणताही असो फुले मात्र पवार अथवा गांधी चरणीच असतात. मराठीचा झेंडा महाराष्ट्रात फारसा नाही चालत. हे नेहमीच दिसते. जोवर आख्खा महाराष्ट्र बिहारी अथवा इतर राज्याच्या प्रभावा खाली येत नाही तो वर महाराष्ट्रीय लोक जागे होत नाहीत. तो वर मग जात, सहकार, शेती हे सगळे मुद्दे पुरून उरतात. हे मुद्दे योग्य प्रमाणात वापरायचे कसब पवारांकडे आहे. पण निष्ठा कुठे आहे? हे न बोललेलेच बरे. सावकारांची कर्जे भरायला उद्या क्रिकेट सामन्यांचा पैसा आला तर विशेष काही वाटायची गरज नाही.
शिवसेनेच्या या प्रवासात बाळासाहेबांचे पुत्र प्रेम, अथवा राजला न थांबवण्याचे कारण आजवर अनुत्तरित आहे. बाकी बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना आणि शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादी हे दोन पक्ष हे खरेच आपले अस्तित्व टिकवतील का? हे पाहायला हवे.